देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- बंदर आणि सीमेवर अडकलेल्या कांद्याला केंद्र सरकारची परवानगी, सूत्रांची माहिती; सरकारच्या निर्णयाकडे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं लक्ष
- पश्चिम रेल्वेवर 21 सप्टेंबर पासून लोकलच्या जादा फेऱ्या, 350 ऐवजी आता 500 लोकल धावणार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होण्याची शक्यता; मराठा आरक्षण, इंदू मिल यांविषयांवर चर्चा होण्याचा अंदाज
- राज्यात पुणे, लातूर परभणी, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव, सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती
- लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या, पालकमंत्री अजित पवार यांची सूचना
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच; भाजपचे खासदार उदयनराजे यांचं वक्तव्य
- इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा; वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भूमिका
- डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला; त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
- ड्रग्ज माफियांच्या संपर्कामध्ये राजकारणी आणि खेळाडूही, अटकेत असलेल्या ड्रग पेडलरचा जबाब; अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
- अबुधाबीत आयपीएलच्या 13व्या मौसमाला आजपासून सुरुवात; सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने