स्मार्ट बुलेटिन | 19 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा



    1. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, आज, उद्या अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    2. महाराष्ट्र विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये, निवडणुकांच्या तोंडावर काय घोषणा करणार याकडे लक्ष, महाजनादेश यात्रेचाही समारोप

    3. 144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, माझाच्या तोंडी परीक्षेत रावतेंचं मोठं विधान, तर आदित्य ठाकरेंकडून भाजपनं दिलेल्या आश्वासनाची आठवण

    4. परळीत मुंडे भाऊ-बहीण आणि बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमधली लढत निश्चित, शरद पवारांकडून बीडमधल्या पाच उमेदवारांची घोषणा, तर काँग्रेसचे दिग्गज रिंगणाबाहेरच

    5. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घ्या, काही राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी, तर बॅलेट इतिहासजमा झाल्याचं जाहीर करत आयोगाचा विरोधकांना दणका






  1. आदित्य ठाकरेंकडून खड्ड्यांचं खापर पावसावर, डोंबिवली दौऱ्यात खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ, दौऱ्याच्या तोंडावर खड्डा बुजवणाऱ्यांचं पितळ उघड

  2. विकासकामं म्हटल्यावर त्याचा कुठेतरी पर्यावरणावर परिणाम होणार, आरे प्रकरणात पर्यावरणवादी याचिकाकर्त्यांची हायकोर्टाकडून कानउघडणी

  3. 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तीवाद पूर्ण करा, अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून वकिलांना डेडलाईन, तर कोर्टाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची अमित शाहांकडून ग्वाही

  4. पाकिस्तानचा पुन्हा एकदा आडमुठेपणा, अमेरिका दौऱ्यावर निघालेल्या मोदींना हवाईहद्द वापरण्यास पाकिस्तानचा नकार, परंपरा तोडण्यावरुन भारताचा आक्षेप

  5. कॅप्टन कोहलीच्या खेळीने भारताची टी-20 मालिकेत 1-0 ने सरशी, दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने उडवला धुव्वा