1. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, अर्थव्यवस्था, काश्मीरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, 27 महत्त्वाच्य़ा विधेयकांवर चर्चेची शक्य़ता

    2. महाशिवआघाडीबाबत चर्चेसाठी आज शरद पवार-सोनिया गांधींची भेट निश्चित, मंगळवारी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा, तर संजय राऊतंही सोनियांची भेट घेणार

    3. एनडीए कुणाची जहागीरी नाही, शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याच्या भाजपच्या घोषणेनंतर संजय राऊत आक्रमक, मनमानी सुरु असल्याचा आरोप

    4. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या फडणवीसांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, मी पुन्हा येईन च्या घोषणांनी फडणवीसांवर रोष व्यक्त

    5. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही 'वर्षा' बंगल्यातच; तीन महिन्यांची वाढवली मुदत






  1. मुंबई मनपात शिवसेनेला रोखण्याचे भाजपचे प्रयत्न, भाजपने काँग्रेसला संपर्क केल्याचा रवी राजा यांचा दावा, तर महापौरपदासाठी सेनेकडून यशवंत जाधवांचं नाव निश्चित

  2. एक्स्प्रेस वेवर आता फक्त ताशी शंभर किमीची वेग मर्यादा, वाढत्या अपघातांमुळे पाऊल, नियम तोडल्यास एक हजार रुपये दंड

  3. भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळा माणूस, शरद बोबडे आज 47 वे सरन्यायधीश म्हणून शपथ घेणार

  4. अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचा निर्णय

  5. इतिहासामध्ये मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू मुस्लिमांनी घेऊ नये, भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक पद्मश्री के. के. मोहम्मद यांचं वक्तव्य