1. स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, काडीमोडाचे राऊतांकडून स्पष्ट संकेत, सेना खासदार विरोधी बाकावर बसण्याची शक्यता


2. अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी राज्यपालांकडून मदत जाहीर, खरिपासाठी प्रतिहेक्टरी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजारांची मदत, मदत अपुरी असल्याची शेतकरी नेत्यांची तक्रार

3. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदत वाढवून देण्याची 'महाशिवआघाडी'ची मागणी

4.शरद पवार आज दिल्लीत, मात्र उशीरा दाखल होणार असल्यानं सोनियांना सोमवारी भेटण्याची शक्यता, दिल्लीला निघण्यापूर्वी पुण्यात राष्ट्रवादीची बैठक

5. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु राहणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर निर्णय, गरजू रुग्णांना मोठा दिलासा



6. राज्यभरातल्या महापालिकांत महाशिवआघाडीच्या प्रयोगाची शक्यता, फोडाफोडी टाळण्यासाठी नाशिक, चंद्रपुरातले भाजप नगरसेवक अज्ञातस्थळी

7.पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक

8. मुंबई महापालिकेला लवकरच मिळणार तब्बल 1800 कोटींची प्रॉपर्टी, 15 वर्ष जुन्या सेव्हन हिल रुग्णालया प्रकरणाचा पालिकेच्या बाजून निकाल

9. अनिल अंबानी यांचा रिलायन्स कम्युनिकेशनच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा, तिसऱ्या तिमाहीतही रिलायन्स कम्युनिकेशनला 30 हजाराहून अधिक कोटींचा तोटा

10. इंदूर कसोटीत तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाकडून बांगलादेशचा फडशा; भारताचा बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय, शमी आणि अश्विनचा मारा प्रभावी