स्मार्ट बुलेटिन | 16 डिसेंबर 2019 | सोमवार


1. महाविकासआघाडी सरकारचं आजपासून पहिलं अधिवेशन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत

2. सत्तेसाठी शिवसेना किती लाचार होणार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा सवाल, तर भाजपनेच सावरकरांच्या तत्वांशी द्रोह केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी, भाजप हिंसा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

4. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता, 31 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल जारी करण्यात येणार असल्याची माहिती

5. पीएमसी खातेधारकांच्या आक्रोशाची अखेर मातोश्रीकडून दखल, अधिवेशनानंतर मुख्यमंत्री खातेदारांना भेटणार, घोटाळ्याबाबत माहिती देण्याची अधिकाऱ्यांना सूचना


6. चित्रपट महामंडळाच्या बैठकीत तुफान राडा, जुनं प्रकरण काढून गदारोळ, तर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची अभिनेता सुशांत शेलारची तक्रार

7. फास्टॅगचा निर्णय आता नव्या वर्षात लागू होणार, तुटपुंज्या फास्टॅगमुळे तारीख पुढे ढकलण्याची सरकारवर नामुष्की

8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमात बदल, आजपासून NEFT ची सुविधा 24 तास, नेटबॅकिंग करणाऱ्या ग्राहकांना दिलासा

9. लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती आगामी वर्षात वाढणार, 5 ते 15 रुपयांची वाढ आणि पाच टक्के जीएसटी द्यावा लागणार

10 टीम इंडियाचा वेस्ट इंडिजकडून आठ विकेट्सने पराभव, हेटमायर, होपची धडाकेबाज खेळी, तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी