1. अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी वीजतोडणीवर लावलेली स्थगिती अधिवेशन संपताच उठवली, हे तर लबाड सरकार,  विरोधकांचा हल्लाबोल


2. मुंबई घरकाम करणाऱ्या महिलांची कोरोना चाचणी होणार, इमारतींमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बीएमसीचा निर्णय


3.औरंगाबादमध्ये 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन, कल्याण-डोंबिवलीमध्ये 7 वाजेपर्यंतच दुकानं सुरु राहणार, जळगावात रात्री 8 नंतर जनता कर्फ्यूचं आवाहन


4.आधी फाशी मग चौकशी हे मान्य नाही, सचिन वाझेंवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तर ठाकरेंना वाझेंचे वकील संबोधणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अनिल परबांकडून जल्लादाची उपमा


5. सचिन वाझेंची गुन्हे शाखेतून उचलबांगडी, एनआयएकडूनही चौकशीची शक्यता, वाझेंचा पाठलाग करणारी बनावट नंबर प्लेट असलेली गाडी कॅमेऱ्यात कैद 



6. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या, खासदार उदयनराजेंचं ट्वीट, राज्यकर्त्यांची आरक्षणविरोधी मानसिकता असल्याचा आरोप


7. मुंबईत विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, याच महिन्यात होणार परीक्षा


8. घरगुती एलपीजी सिलेंडर अर्धा रिकामा करुन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, सिलेंडरचं वजन तपासण्याचं ग्राहकांना आवाहन


9. नंदीग्राममध्ये जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जींवर उपचार सुरु, जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप, सोशल मीडियावर घटनेची जोरदार चर्चा


10. महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट, निर्बंधांसह भक्तांकडून भोलेनाथाचं दर्शन, प्रसिद्ध शिवमंदिरांना आकर्षक रोषणाई