देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. बिहार विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात, एक्झिट पोलमध्ये सत्तांतराचे संकेत; तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला
2. बिहार विधानसभांसोबतच देशातील पोटनिवडणुकांचेही आज निकाल, उत्तर प्रदेशात भाजपसाठी प्रतिष्ठातेची लढाई, तर मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचं भविष्य ठरणार
3. दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सर्वच महापालिकांची नियमावली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य फटाके फोडण्यास परवानगी, तर भाऊबीज ऑनलाईन साजरी करण्याचं आवाहन
4. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दररोज तीन तास चौकशी करण्यास पोलिसांना परवानगी, राज्यपालांना गोस्वामी यांची चिंता
5. आज मुंबईत ओबीसींसह वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांची गोलमेज परिषद, ओबीसी कोठ्यातून मराठा आरक्षण मिळू नये म्हणून रणनीती ठरवणार
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha
6. प्रियकराच्या हत्येची सुपारी देणाऱ्या मुंबईतील नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला बेड्या, महापालिकेच्या इंजिनियरचा जीव वाचला, कॉन्ट्रॅक्ट किलरलाही अटक
7. अमेरिकेतील फायजर आणि बायोटेक कंपनीच्या कोविड लसीला 90 टक्के यश, तिसऱ्या चाचणीनंतर कंपनीचा दावा
8. जगभरात 70 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, गेल्या 24 तासांत 4.82 लाख नवे रुग्ण, तर 6770 लोकांचा मृत्यू
9. वुमन टी-20 चॅलेंजच्या अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सची बाजी, स्मृती मंधानाच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद, सुपरनोव्हाजवर 16 धावांनी मात
10. आयपीएलच्या तेराव्या सीझनच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये लढत; मुंबई पाचव्यांदा तर दिल्ली पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी मैदानावर उतरणार