1. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपदासह आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद

2. मराठा, धनगर, भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात खलबतं, निर्णयापूर्वी उद्धव ठाकरे आंदोलकांच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा

3. 'ठाकरे' सरकारचा दणका; भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 310 कोटींच्या हमीचा निर्णय रद्द

4. सनातन संस्थेच्या बंदीसाठी कायदा करा, विजय वडेट्टीवारांची मागणी, तर संभाजी भिडे-मिलिंद एकबोटेंना पाठीशी न घालण्याचं हुसेन दलवाईंचं आवाहन, काँग्रेसच्या मागणीनं मुख्यमंत्र्यांसमोर पेच

5. भाजपात ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याची एकनाथ खडसेंची भावना, वेगळी मोट बांधण्यासंदर्भात सूचक विधान, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या.



6. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता, अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

7. सिंधुदुर्गातल्या प्रसिद्ध 'भोगवे' समुद्र किनाऱ्याला मानाचे 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र' कोकणातल्या निसर्गसंपदेवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर

8. खड्डेमुक्त रस्ते बनवण्याच्या महापालिकेच्या नव्या धोरणामुळे मुंबईकरांची गोची, नव्या धोरणामुळे मुंबईत महापालिकेकडून पुढील एका वर्षात एकही नवा रस्ता तयार करणार नाही

9. तब्बल 106 दिवसांनंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तिहार कारागृहाबाहेर, आयएनएक्स मीडियाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन, आज राज्यसभेत उपस्थित राहणार

10. सुदानची राजधानी खार्तूमजवळच्या परिसरातील एका कारखान कारखान्यात भीषण स्फोट, 18 भारतीयांचा मृत्यू