1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये स्वागताची जय्यत तयारी, मोटेरा स्टेडियमही सजलं


 

  1. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, गिरणी कामगारांच्या घरांसाठी 1 मार्चला लॉटरी, तर एल्गारच्या तपासावरुन सरकारमध्ये मतभेद नसल्याचंही स्पष्टीकरण


 

  1. आजपासून ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, वादग्रस्त मुद्दे टाळण्यासाठी महाविकासआघाडीची बैठक, तर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार


 

  1. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईकांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर सहा नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती


 

  1. ठाकरे सरकार अकरा दिवसांत पडेल, भिवंडीतील कार्यक्रमात भाजप खासदार नारायण राणेंचं वक्तव्य, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचाही राणेंचा दावा


 

एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 24 फेब्रुवारी 2020 | सकाळच्या बातम्यांचा आढावा



  1. पुण्यात बांगलादेशी असल्याच्या संशयाने मनसेने पकडलेल्या नागरिकांकडून भारतीय असल्याचे पुरावे सादर, संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास झाल्याने राज ठाकरेंवर खटला दाखल करणार


 

  1. अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून भारतात आणलं, रॉ ची कारवाई, पुजारीवर खंडणी आणि हत्येचे तब्बल 200 गुन्हे


 

  1. मुंबईत आता मेट्रो स्टेशनबाहेर भाडेतत्वावर सायकल मिळणार, दोन रूपयात तासभर सायकलवारी, मुंबई मेट्रो वन-चा उपक्रम


 

  1. भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी दोन तास लागण्याची शक्यता, वारंवार लागणाऱ्या आगीत संशयाचा धूर

  2. वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, दहा गडी राखून भारतावर दणदणीत विजय, कसोटी चॅम्पियशनशिपमध्ये सात सामन्यातील टीम इंडियाचा पहिला पराभव