देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. अखेर 5 दिवसांनंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सुपूर्द, कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, संभाव्य यादी माझाच्या हाती


2. कॅबिनेट न मिळाल्यानं नाराज अब्दुल सत्तार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, अर्जुन खोतकरांकडून काल सत्तारांची मनधरणी, आजच्या भेटीकडे राज्याचं लक्ष

3. विश्वासघातानं चाललेलं सरकार ६ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, फडणवीसांचं भाकित, खातेवाटप दिरंगाई आणि नाराजीवरुन ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा

4. स्मशानात राहून जनतेची कामे करु, स्मशानाजवळील बंगला मिळाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू नाराज

5 हाडं गोठवणाऱ्या थंडीत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला सुरुवात, हजारो उमेदवारांवर कडाक्याच्या थंडीत बसण्याची वेळ, प्रशासनाकडून कुठलिही व्यवस्था नाही

6. सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरु होण्याआधी गॅसचा स्फोट, चौघे जखमी, उद्घाटनासाठी फुगे फुगवत असताना गॅसचा स्फोट

7. मुंबई आयआयटीत टेकफेस्टची धूम, तानाजी रोबो, लेक्चर देणारा रोबो ठरला लक्षवेधी, भन्नाट टेक्नोलॉजी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

8. सीएएसाठी भाजपनं दिलेला समर्थन नंबर ट्विटरवर ट्रोल, सनी लिओनीच्या नावानं फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल, लाखो जणांची फजिती

9. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गतविजेता बाला रफिक शेख आणि अभिजीत कटकेची विजयी सलामी, ६१ किलो माती विभागात पुण्याच्या सागर मारकडला सुवर्ण

10. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, चंद्रकांत खैरेंची सत्तारांवर जहरी टीका, तर योग्य वेळी उत्तर देणार, सत्तारांकडून स्पष्ट, औरंगाबाद झेडपी निकालावरुन शिवसेनेत वादंग

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जानेवारी 2020 | रविवार | ABP Majha