स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

1. राजकीय भूकंपासाठी भाजपने उद्याचा मुहूर्त निवडला, नवी मुंबईतील नाईक कुटुंबियांसह शिवेंद्रराजे, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर भाजपात जाणार, सूत्रांची माहिती

2. मुंबईत राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी आणि जयंत पाटलांची गुफ्तगू, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी, 9 ऑगस्टला मनसे रस्त्यावर उतरणार

3. तिहेरी तलाकची आज राज्यसभेत परीक्षा, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं अडचण, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

4. काँग्रेस अध्यक्षपदी प्रियंका गांधींची वर्णी लागण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर दोन महिन्यांपासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना

5. ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक महिला गंभीर



6. महापौर निधीतून मुंबईकरांना मदतीचा हात, गरजू रुग्णांना 25 हजारांपर्यंत मदत मिळणार, नगरसेवक एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार

7. पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे मुंबईसह राज्यातील धरणांमध्ये खळखळाट, गंगापूरमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर

8. कोकण आणि विदर्भातही मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गात काही गावांचा संपर्क तुटला तर गडचिरोलीच्या पार्लकोटा नदीलाही पूर

9. भारतीय संघात मतभेद असल्याच्या बातम्यांचं विराट कोहलीकडून खंडन, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय कर्णधाराची पुन्हा रवी शास्त्रींनाच पसंती

10. पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्कराचं विमान कोसळलं, पाच सैनिकांसह 15 जणांना मृत्यू