वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. असं असतानाही जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीबद्दल सर्वांना कल्पना आहे. जिल्ह्यात दारु विकताना, प्राशन करतानाचे अनेक गुन्हे नोंद होतात. मात्र दारुबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच दारु पिऊन गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. तळेगाव येथील उड्डाणपुलाखालील चौकात धिंगाणा घालत असताना पोलिस कर्मचारी संदीप खंडारे यास नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने नागरिकांशी अरेरावी केली. काही जणांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी काहींनी या घटनेचा व्हिडीओही काढला.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संदीप खंडारेला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली. तळेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात 70 लाखांच्या दारुवर रोलर फिरवला