1. अनिल देशमुख ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी, जावई गौरव चतुर्वेदींची चौकशी, वकील आनंद डागा ताब्यात, सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी अटकेत, प्राथमिक अहवाल लीक झाल्याचा आरोप


2. 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपालांमध्ये चर्चा, लवकरात लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची मागणी 


3. आता खाजगी आणि सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालयं चालवता येणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजूरी


4. कोकणाच्या धर्तीवर चाळीसगावला मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती, पूरस्थितीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा 


5. पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव होतं, आता दुसरं एक नाव येतंय, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 02 सप्टेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha



6.  राज्यात तूर्तास नाईट कर्फ्यूची गरज नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती, गणेशोत्सव निर्बंधांविना पार पडण्याची शक्यता 


7. कोल्हापूरच्या भुदर्गड तालुक्यातील मेघोली बंधारा फुटला, एका महिलेचा मृत्यू, अनेक जनावरंही दगावली, अचानक वाढलेल्या पाण्यानं शेतीचं मोठं नुकसान 


8. रक्तपेढीतील रक्तामुळं आठ महिन्यांच्या चिमुकलीला एड्सची लागण, अकोल्यातील मूर्तीजापूरमधील धक्कादायक प्रकार


9. काश्मीरमधील फुटिरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांचे निधन, पाकिस्तानात राजकीय दुखवटा जाहीर 


10. भारत-इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना आज इंग्लंडमधील ओव्हलवर, मालिका 1-1 नं बरोबरीत, भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता