2. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये मोठी कारवाई, आरोपीकडे महत्त्वाची कागदपत्रं सापडल्याने खळबळ
3. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान
4. आचारसंहिता उल्लंघनाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची तक्रार, तर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये ठेवताना सीसीटीव्ही बंद केल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप
5. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, सुपुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
6. वसंतदादा पाटलांच्या वारसांनी भाजपात यावं, पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर
7. लोकसभेतले 83 टक्के खासदार कोट्यधीश, एडीआर अहवालात माहिती, 32 खासदारांकडून 50 कोटींहून अधिकची संपत्ती घोषित, तर 33 टक्के खासदारांवर गुन्ह्यांची नोंद
8. एक मार्च 2021 पासून जनगणनेला सुरुवात होणार, गृह मंत्रालयाची अधिसूचना, 2011 च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 120 कोटी
9. मुंबई विमानतळावर महिला आणि पुरुष टॅक्सी चालकांना एकत्र काम करावं लागणार, प्रियदर्शनी महिला टॅक्सी चालक संघटनेला स्वतंत्र जागा देण्यास विमानतळ प्रशासनाचा नकार
10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खातं उघडलं, अटीतटीच्या लढतीत मुंबईची बंगळुरुवर सहा धावांनी मात, शेवटचा चेंडू नो बॉल न दिल्यामुळे कोहलीची अम्पायरवर नाराजी
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार | एबीपी माझा