1. अफगाणिस्तानात आयसिसच्या ठिकाणांवर अमेरिकेकडून ड्रोन हल्ला, काबूल विमानतळांवरील स्फोटानंतर कारवाई, स्फोटांच्या मास्टरमाईंडचा खात्मा केल्याचा दावा

2. रत्नागिरीत नाव न घेता हल्लाबोल करणाऱ्या नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल, वैयक्तिक टीका केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा शिवसेनेचा पवित्रा

3. जमावबंदीचे आदेश धुडकावून लावत राणेंच्या स्वागतासाठी समर्थकांकडून कणकवलीत मोठी गर्दी, पोलिस कारवाईचा बडगा उगाणार का याकडे लक्ष

4. एमआयएस योजनेतंर्गत राज्य सरकारनं टोमॅटो खरेदी करावी, दर कोसळल्यानं केंद्राचा प्रस्ताव, तोटा झाल्यास 50 टक्के भार उचलण्याची केंद्राची तयारी

5. धुळ्याच्या साक्री डेपोतील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे संपवलं जीवन, महामंडळातील संघटना आक्रमक


6. झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बँकांचे तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज विकासकांनी थकवलं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा कारवाईचा इशारा


7. अँटिजन टेस्ट केल्यावरच गणपती विसर्जन करता येणार, ठाणे महापालिकेचा निर्णय, गणेशोत्सवासाठी विशेष खबरदारी

8. पबजी खेळण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून आईच्या खात्यातल्या 10 लाखांवर डल्ला, मुंबईतली धक्कादायक घटना, जाब विचारल्यानंतर घर सोडण्याची धमकी

9. लीड्स कसोटीत भारत सुस्थितीत, दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर, रोहीत शर्मा आणि विराटचीही झुंजार खेळी

10. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युवेंटस क्लबला गुडबाय, मँचेस्टर युनायटेडकडून खेळण्याचा निर्णय