1. दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, सूत्रांची माहिती; हायकोर्टात भूमिका मांडण्याआधी शिक्षणमंत्री महाआधिवक्त्यांशी चर्ची करणार


 



  1. घरीच प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका घेऊन जा, पाच दिवसांनंतर शाळेत परत आणून द्या; छत्तीसगड सरकारच्या परीक्षा पॅटर्नची देशभरात चर्चा


 



  1. अॅलोपॅथी उपचारांबाबत केलेलं वक्तव्य रामदेव बाबांकडून मागे, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली होती नाराजी


 



  1. मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला


 



  1. कोरोनातून बरे झाल्यावर गॅंगरिनचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा, काळजी घेण्याचं आव्हान


 




  1. राज्यात काल दिवसभरात 29 हजार 177 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 26 हजार 672 नवीन कोरोनाबाधितांची नोंद


 



  1. मुंबई पालिकेकडून लसीकरणाचं वेळपत्रक जाहीर, आजपासून 26 मेपर्यंत थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस; तर 27 ते 29 मे रोजी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना डोस मिळणार


 



  1. कडक लॉकडाऊनमुळे खोळंबलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरु होणार, नियमांसह नाशिमधल्या बाजार समित्या सुरु, कांद्याला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष


 



  1. कोरोनामुळे राज्यात 195 मुलांनी आपल्या पालकांना गमावलं, नंदुरबार जिल्ह्यात 98 मुलं अनाथ, तर हिंगोलीत 18 मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपलं


 



  1. केंद्र सरकारने पुन्हा शेतकर्‍यांशी चर्चा करावी; 26 मे रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाला 12 पक्षांचा पाठिंबा