- भिवंडीतील पिराणीपाडा इथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती
- देशभर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले
- भाजपचे आणि माझे चांगले संबंध, लोकांचे हित पाहून लवकरच निर्णय घेईन, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य
- सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना भरचौकात फटके द्या, सावरकर पुतळा विटंबनेवरुन उद्घव ठाकरे आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
- राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत आता पक्षाच्या झेंड्यासह भगवाही फडकणार, अजित पवारांची परभणीच्या पाथरीत घोषणा, तपासयंत्रणांच्या नोटीसवरुन सरकारला टोला
- राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीला नोटीस, ईडीच्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- कलम 370 च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज काश्मीरला जाण्याची शक्यता, प्रमुख विरोधी पक्षांचे नेतेही श्रीनगरला जाणार, काश्मीरच्या राज्यपालांनी दिलं होतं आव्हान
- जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा, आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी सरकारची महत्वाची पावलं
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप, राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी समिती गठित
- अँटिगा कसोटीत विंडीज विरुद्ध टीम इंडियाची पहिल्या डावात 297 धावांची मजल, रवींद्र जाडेजाचं झुंजार अर्धशतक