1. कोल्हापुरातील पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी, जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर, पन्हाळा मार्गावर अडकलेल्या कर्नाटकच्या बसमधून 25 जणांचं रेस्क्यू


2. रायगड जिल्ह्यातील तळई गावांत दरड कोसळून 30 घरांचं मोठं नुकसान, बचावकार्यात अडथळे, तर साताऱ्यातील कोंढावये गावातही दरड कोसळली


3. मुसळधार पावसामुळे कोयनेतून विसर्ग होण्याची शक्यता, तर खडकवासला धरणातून 25 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु, मुळा-मुठा काठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचं आवाहन


4. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम, वाशिष्ठी नदीच्या पुरामध्ये हजारो लोक अडकले, एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु 


5. तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जुलै 2021 | शुक्रवार | ABP Majha



6. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाची उसंत, लोकल आणि बससेवा सुरळीत, बदलापूर भिवंडीतही पाणी ओसरलं


7. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा


8. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मूभा द्या, हायकोर्टात याचिका


9. ऑलिम्पिकचं मैदान गाजवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, आज टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा, 204 देशांचे 11 हजार 238 खेळाडू सहभागी होणार 


10. आज श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा तिसरा एकदिवसीय सामना, क्लिन स्वीपपासून वाचण्यासाठी श्रीलंकेचा प्रयत्न