Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 मे 2021 | शनिवार | ABP Majha


1. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय, दीड कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ


2. सिडकोच्या सात हजार लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, घरांचा ताबा त्वरित देण्याचे नगरविकास मंत्र्यांचे सिडकोला आदेश


3.  लसींची उपलब्धता लक्षात न घेताच सरकारकडून लसीकरणाला परवानगी, सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांचा दावा


4. देशात म्युकरमायकोसिसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारची तयारी, पाच कंपन्यांना औषध बनवण्याचा परवाना, परदेशातूनही औषध आयात करणार


5. डीआरडीओकडून अँटीबॉडी शोधणारा संच विकसित, एक हजार नमुन्यांच्या चाचणीनंतर आयसीएमआरकडून मान्यता


6. लस पुरवठा न झाल्याने आज पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण बंद राहणार,  तर लस नसल्याने कल्याण डोंबिवलीतही लसीकरणाला ब्रेक


7. नाशिकचा कडक लॉकडाऊन 23 तारखेपर्यंतच, 24 तारखेपासून ब्रेक द चेनचे नियम लागू, नाशिकमधील पॉझिटिव्हिटी रेट 40 वरुन 8 टक्क्यांवर


8. एअर इंडियाचा सर्व्हर हॅक, 45 लाख प्रवाशांची माहिती लीक झाल्याचा दावा, नाव, जन्मतारीख आणि क्रेडिट कार्डच्या माहितीची चोरी


9. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून तूर्तास दिलासा, 'त्या' पत्रानंतरच सिंह यांच्याविरोधात गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल


10. गडचिरोलीमध्ये C-60 जवानांचं सर्वत्र कौतुक, 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बॅण्ड पथकाकडून जवानांचं वाजतगाजत स्वागत