स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2019 | सोमवार | एबीपी माझा



    1. इस्त्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु, आज दुपारी 2.43 मिनिटांनी आकाशात झेपावणार, मोहिमेकडे जगाचं लक्ष

    2. विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून 288 जागांसाठी तयारी, तर शिवसेनेकडूनही मातोश्रीवर स्वबळाची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती

    3. केवळ भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच, भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

    4. सत्तेचा माज उतरवण्याची हिंमत शिवबंधनात, शिवसेनेचे नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत याचं वक्तव्य

    5. जय श्रीरामचा नारा देण्यासाठी तरुणाला मारहाण, औरंगाबादमध्ये पुन्हा झुंडशाही, पोलिसांकडून गुन्हा दाखल






  1. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात वरुणराजाची कृपादृष्टी, औरंगाबाद, नांदेड, बीडसह जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाच्या सरी

  2. महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, आदिवासी महामंडळाचा तांदूळ घोटाळा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून उघड

  3. पगारावरुन शिक्षक-मुख्याध्यापक भिडले, शाळेतच एकमेकांची धरली कॉलर, परभणीतील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

  4. तुमची टॉयलेट-गटारं साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही, भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह याच्या वक्तव्याने वाद

  5. कधी निवृत्त व्हायचं ते धोनीला ठाऊक आहे, विश्वचषकानंतर पंतला अधिक संधी देण्याचा आमचा प्लॅन, निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांची स्पष्टोक्ती