1. पी. चिदंबरम यांची रात्रभर कसून चौकशी, डझनभर प्रश्नांची सरबत्ती, आज सीबीआय कोर्टासमोर हजर करणार

    2. सकाळी साडेदहा वाजता राज ठाकरे ईडीसमोर हजर होणार, पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त, राज ठाकरेंकडून शांततेचं आवाहन, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस

    3. आजपासून महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, धुळे-नंदुबराबारमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा, विधानसभेच्या निवडणुकीची तयारी

    4. नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी कार्यरत, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा गौप्यस्फोट, भाजपबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार

    5. महाराष्ट्र काँग्रेसकडून प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना बदलण्याची हायकमांडकडे मागणी, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर






  1. वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला हैदराबादमध्ये बैठक

  2. भाजपसोबत राहायचं की नाही 10 दिवसात ठरवणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांचं स्पष्टीकरण

  3. अमित शाहांसोबतच्या भेटीमुळे नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, सिनेक्षेत्रासह राजकीय पटलावर चर्चेला ऊत

  4. नालासोपाऱ्यात दीड कोटींचं कोकेन जप्त, नायजेरियन तरुणाला अटक, एकजण फरार, पालघर एटीएस विभागाची कारवाई

  5. विंडीजविरुद्धच्या अँटिग्वा कसोटीत टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये उतरणार, भारतीय शिलेदार कसोटी इतिहासात पहिल्यांदाच नंबर असलेली जर्सी परिधान करणार