शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे हे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेने देखील ही जागा जिंकायची असा निश्चिय केला आहे. त्यासाठीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे मुत्सद्दी आमदार अनिल परब यांना या विधानसभेचे विभाग प्रमुखपद देण्यात आले आहे. नुकत्याच चांदिवली येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात अनिल परब यांनी या विधानसभेवर भगवा फडकविण्याची खुद्द उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे सांगितले होते.
शिवसेनेत अंतर्गत बंडाळी झाली नाही आणि भाजपने जर शिवसेनेला पुरेपूर मदत केली तर नसीम खान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. परंतु भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य शुभ्रांशू दीक्षित देखील गेली दोन वर्षे या विधानसभेत निवडणूक लढविण्याचा दृष्टीने जनसंपर्क वाढवत आहेत. भाजपने तिकीट न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यातच आधी एमआयएममध्ये असलेले काही उमेदवार आता नव्याने वंचित बहुजन आघाडीमधून लढण्याची तयारी करीत आहेत. याचा फटका मात्र विद्यमान आमदार नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे.
चांदिवली विधानसभेचा इतिहास
2009 साली या विधानसभेतून काँग्रेसचे नसीम खान आणि तेव्हा मनसेत असलेले आणि आता शिवसेनेत असलेले दिलीप लांडे यांच्यात थेट लढत झाली होती. यात नसीम खान 82 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 साली दिलीप लांडे यांनी घाटकोपर पश्चिममधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदार संघातून शिवसेनेतर्फे संतोष सिंग यांनी निवडणूक लढवली होती. तर मनसेचे ईश्वर तायडे उमेदवार होते. त्यामुळे नसीम खान यांनी तब्बल 73 हजारांपेक्षा जास्त मते मिळवून विजय मिळविला होता.
सध्या स्थिती आकड्यांची गणिते
337 बूथ असलेल्या चांदिवली मतदार संघात मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी मतदार हा प्रत्येकी एक लाखाच्या जवळपास आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार असलेल्या पूनम महाजन यांना या मतदार संघातून 1,00998 मते तर आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांना 73,743 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे चांदिवलीमधून नक्कीच युतीने चांगली बाजी मारली होती. सध्या या विधानसभा क्षेत्रातील नऊ नगरसेवकांपैकी सहा शिवसेनेचे, दोन भाजपचे तर एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अशात या वेळी बहुजन वंचित आघाडी ने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान