1. ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार मात्र बंद पुकारु नका, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन, विरोधक राज ठाकरेंच्या पाठीशी
2. पुरामुळे एक हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या पिकांना संपूर्ण कर्जमाफी, कर्ज घेतले नसल्यास भरपाई, पडझड झालेली घरं बाधून वर 1 लाख रुपये देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
3. दिल्लीत नाना पाटेकरांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना वेग, पूरग्रस्तांसदर्भात चर्चा केल्याचा नानांचा दावा
4. राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक राजकीय दहीहंड्या रद्द, दहिहंडीची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय
5. ऐन पावसाळ्यात लातुरात मोठं पाणीसंकट, पुन्हा वॉटर ट्रेनची चाचपणी, शहरात 50 टक्के पाणी कपात
6. 'महापुरात सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे', राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंची एकेरी भाषेत टीका
7. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींमध्ये जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा, तर अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यमध्येही काश्मीरबाबत खलबतं
8. एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दिलासा, शिवनेरीसह साध्या गाड्यांचं व्हीटीएस प्रणालीद्वारे लोकेशन कळणार
9. मुंबईची पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता, ऑगस्ट महिन्याअखेरीस तीन दिवस समुद्राला मोठी भरती
10. ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम यांचं 92 व्या वर्षी निधन, दीर्घकाळापासून फुप्फुसाच्या आजाराने होते त्रस्त, बॉलिवूडवर शोककळा