1. विदर्भातील अनेक जिल्ह्यात रात्रभर वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी तर पुढील दोन तास पावसाचा इशारा


 



  1. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार


 



  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,105 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 50 जणांचा मृत्यू


 



  1. मुंबईतल्या क्लिनअप मार्शल्सची एबीपी माझाकडून पोलखोल, मास्क न घातल्यास कारवाई टाळण्यासाठी अवैधरित्या वसुली, कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश


 



  1. उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन समोर, धीरज जगतापला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे धर्मांतर करत असल्याचा संशय


 



  1. परमबीर सिंहांवर कायदेशीर बाबी तपासून निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया, सूत्रांची माहिती तर परमबीर यांना परदेशात पळून जाण्यास भाजप नेत्यांची मदत, नाना पटोलेंचा गंभीर आरोप


 


 



  1. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती, पंतप्रधान मोदींच्या निर्देशांनुसार सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित फाईल्सचं स्वच्छता अभियान तर लाल बहादूर शास्त्रींनाही देशवासियांकडून अभिवादन


 



  1. मुंबईत 7 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी, तर महाराष्ट्रात चित्रपटगृहं सुरु होणार असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण


 



  1. मुंबई वगळता महाराष्ट्रात नवरात्रात गरबा खेळण्यासाठी सशर्त परवानगी, कोरोना नियमांचं पालन करुन गरबा खेळण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन


 


 



  1. पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सर पाच गडी राखून विजय, केएल राहुल ठरला विजयाचा शिल्पकार