Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 मे 2021 | बुधवार | ABP Majha



  1. तोक्ते चक्रीवादळानंतर बॉम्बे हायजवळच्या भरकटलेल्या तराफ्यावरील 93 कर्मचारी अजूनही बेपत्ताच, नौदलाकडून शोध सुरुच, आतापर्यंत 614 जणांची सुखरुप सुटका


 



  1. तोक्ते वादळामुळं 5 राज्यांत 23 जणांचा मृत्यू, कोकणात 1 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, पंतप्रधान गुजरात तर विरोधी पक्षनेते फडणवीस कोकण दौऱ्यावर


 



  1. तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती


 



  1. पुण्यात आज 45 वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीच लसीकरण, नाशकात फक्त एकाच केंद्रावर लस उपलब्ध, तर मुंबईत महत्त्वाच्या केंद्रांवर लसीकरण सुरु होणार


 



  1. दिलासा...! राज्यात काल दिवसभरात 52 हजार 898 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 28 हजार 439 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


 



  1. मुंबईत अडीच महिन्यांनंतर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार पेक्षा कमी, काल दिवसभरात फक्त 953 रुग्णांची नोंद


 



  1. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तेलंगणात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला; निर्बंध कायम, प्रशासनाचे निर्देश


 



  1. कोरोनामुक्त झालेल्यांचं 9 महिन्यांनंतर लसीकरण करा, एनटीएजीआय समितीचा केंद्राला सल्ला, उपचारानंतर काही महिन्यांत पुन्हा लागण होत असल्यानं सल्ल्यावर प्रश्न उपस्थित


 



  1. उजनीतून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटलांची घोषणा, दत्तात्रय भरणेंना झटका


 



  1. बारामतीच्या रस्त्यावर पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पकडला चोरीचा ट्रक, पोलिसांचे बॅरिकेट्स, रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीलाही ट्रक चालकाची जोरदार धडक