स्मार्ट बुलेटिन | 18 जुलै 2019 | गुरुवार | एबीपी माझा

  1. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरची स्थगिती कायम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष, मात्र नव्यानं खटला सुरु होणार असल्यानं आव्हान कायम


 

  1. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने टेकले गुडघे, हाफिजला भारताकडे सोपवण्याच्या मागणीला जोर


 

  1. आजपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेवर, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा सेनेचा नवा प्रयोग


 

  1. काँग्रेसचा कार्याध्यक्षच भाजपच्या वाटेवर असल्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, तर चंद्रकांत पाटलांचं विधान हास्यास्पद, काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचं उत्तर


 

  1. पीक विम्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा, 15 दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा इशारा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रस्त्यावर




  1. डोंगरीतील कोसळलेली केसरबाई इमारत म्हाडाचीच, पालिका आयुक्तांची स्थायी समितीला कबुली


 

  1. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या संस्थेचं हरित पट्ट्यात बेकायदेशीर बांधकाम, आवश्यक परवानग्या सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश


 

  1. मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


 

  1. पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र कार्यकर्त्यांनी दिला चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज अधोरेखित करणारी घटना


 

  1. कर्नाटक विधानसभेत आज कुमारस्वामींची विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा, बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय