कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांना पन्हाळ्यावर दारु प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाचं चोप दिला आहे.

पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारु पीत होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निर्दशनात येताचं त्यांनी दारु पिणाऱ्यांना कारमधून बाहेर काढलं आणि त्य़ांना चांगलाचं चोप दिला.



दरम्यान पन्हाळावर दारु पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरवर्षी पन्हाळा ग़डावर इतिहासातील स्‍फूर्तीदायी अशा दैदीप्यमान घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद‍देशाने ही मोहिम निघते.  धारकरी आणि शिवभक्तांसह अनेक इतर लोकं या मोहिमेत सहभागी होतात. मात्र दारु पिऊन पवित्र स्थान भ्रष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिवभक्त करत आहेत.