1. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि आरएसएसची औरंगाबादमध्ये गुप्त बैठक, विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती
2. राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत पक्षाच्या बैठकीला दांडी, लवकरच पक्षप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता
3. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक, राज्य सरकारच्या वृक्षलागवड योजनेवरुन अभिनेता सयाजी शिंदेंची सरकारवर टीका
4. मराठवाड्यातील कृत्रिम पावसासाठी अखेर विमान भारतात दाखल, सोमवारपासून प्रयोगाला सुरुवात, बबनराव लोणीकरांनी सांगितला नवा मुहूर्त
5. महाराष्ट्रातील महापुराविरोधात हायकोर्टात याचिका, नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती असल्याचा याचिकेत आरोप'
6. मुंबईत आजपासून सीएनजी पुरवठा सुरळीत होणार, उरणमधील ओएनजीसी प्रकल्पातील तांत्रिक बिघाड दुरुस्तीच्या मार्गावर, रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा
7. जम्मू-काश्मीर प्रकरण आता अणू युद्धाच्या उंबरठ्यावर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती
8. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या पाचव्या मजल्याची आग नियंत्रणात, आपात्कालीन विभागातील रुग्ण सफदरजंग रुग्णालयात दाखल
9. टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला अर्जुन पुरस्कार; जाडेजासह 19 जणांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड, पॅरा अॅथलिट दीपा मलिकला खेलरत्न
10. ठाणे महानगरपालिकेच्या 33 व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, महापौर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पर्धेला फ्लॅगऑफ