2. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर, तीन सैनिकांचा खात्मा, कृष्णा घाटी परिसरात गोळीबार
3. कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यावर पाकची यूएनमध्ये धाव तर काश्मीर खोऱ्यात फोन सेवा सुरु करण्यावर आज निर्णय होण्याची शक्यता
4. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची घोषणा, संरक्षण क्षेत्रासाठी मोठा निर्णय, लोकसंख्या नियंत्रण, प्लॅस्टिकबंदीचं आवाहन
5. देणगी गोळा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक, स्थानिक स्वराज्यसंस्था आणि जागामालकाची एनओसीही आवश्यक
6. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेसचं पोलखोल यात्रेनं प्रत्युत्तर, नाना पटोले करणार नेतृत्व, 20 ऑगस्टला मोझरीतून यात्रेला सुरुवात होणार
7. येत्या 21 आणि 22 ऑगस्टला उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर, सांगली, कोल्हापुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
8. महापुरात सांगलीच्या नगर वाचनालयातील 90 हजार पुस्तकांचा लगदा, ग्रंथसंपदा नव्याने उभारण्यासाठी मदतीची गरज, माझाचं महाराष्ट्राला आवाहन
9. मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचे प्रयोग फसल्यानंतर आता सरकारने घेतली अमेरिकेची मदत, आधुनिक तंत्रज्ञानाचे विमान दुबईपर्यंत आल्याची बबनराव लोणीकरांची माहिती
10. सप्टेंबरमध्ये अॅपल आयफोन 11 प्रो हा सर्वात महागडा फोन बाजारात येणार, अॅपल पेन्सिलसह अनेक खास फिचर्स