1. सुपर मार्केटमधील वाईन विक्रीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, नागरिकांच्या हरकती मागवणार, तर अण्णा हजारे उपोषणाबाबत आज भूमिका जाहीर करणार


2. बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड, गुजरातच्या एबीजी शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांना 22 हजार 842 कोटींचा चुना, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल


Bank Fraud : बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जातेय.  
 
एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यावर  22842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. हा घोटाळा आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यातील सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. कारण हा घोटाळा नीरव मोदींपेक्षाही मोठा आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनेशनल या घोटाळा करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत.  


3. गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 14 फेब्रुवारीला मतदान, भाजप, काँग्रेस, आप, शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठापणाला


4. पाच राज्यातील निवडणुकीनंतर इंधन दरवाढीची चिन्हं, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं इंधन दरवाढीची शक्यता 


5. किरीट सोमय्यांची सह्याद्री हॉटेलला भेट, पुणे जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप, तर राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांची सोमय्यांना नोटीस


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 फेब्रुवारी 2022 : रविवार



6. गोरेगावमध्ये 5 बोगस दवाखान्यांचा भांडाफोड, 4 बोगस डॉक्टरासह 1 कंपाउंडर अटकेत, रुग्णांच्या जीवाशी खेळ


7.  मुंबईच्या अंधेरीत बड्या बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाकडून निर्घृण हत्या, हत्येनंतर मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव 


8. बजाज ऑटोचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं काल निधन,  आकुर्डीत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार, दुपारी अंत्यसंस्कार होणार


9. पाकिस्तानातून समु्द्रामार्गे आणलेलं 2 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, एनसीबी आणि नौदलाची संयुक्तं कारवाई, तर विशाखापट्टणमध्ये शेकडो कोटींचा गांजा नष्ट


10. आयपीएल मेगालिलावाच्या पहिल्या दिवशी खेळाडूंची चांदी, 15 कोटी मोजून मुंबई इंडियननं इशान किशनला संघात कायम ठेवलं. तर आवेश खान आजवरचा सर्वात महागडा अनकॅप्ड क्रिकेटपटू


IPL Mega Auction 2022 today LIVE : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरु आहे. काल पहिल्या दिवशी  दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मात्र या हंगामासाठी पहिल्या दिवशी काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. 


मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेला सुरेश रैना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ, बांग्लादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू डेविड मिलर यांना कुणीही खरेदीदार काल मिळाला नाही. आज या दिग्गज खेळाडूंसह अन्य काही खेळाडूंच्या लिलावाकडेही लक्ष लागून आहे.