1. 2021-2022 शैक्षणिक वर्षासाठी दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रात घेण्याचा सीबीएसईचा निर्णय, पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्चमध्ये 


2. कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळांची कुलूपं उघडणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, पालकांची संमती असल्यास ग्रामपंचायतींना ठराव मांडता येणार 


3. 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप हायकोर्टात दार ठोठावण्याची शक्यता, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाची हाक, अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता


4. 12 आमदारांचं निलंबन म्हणजे, सदस्य कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका, तर सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आशिष शेलारांचा आरोप


5. एमपीएससीच्या सदस्यांची पदं 31 जुलैपर्यंत भरणार, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जुलै 2021 | मंगळवार | ABP Majha



6. समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहणाऱ्या अनिल देशमुखांची अडचण वाढण्याची शक्यता, अजामिनपत्र वॉरंटसाठी ईडी कोर्टात जाण्याची शक्यता 


7. अतिक्रमण करणाऱ्यांना फुकटात घरं देणारं मुंबई एकमेव शहरं, मालवणी दुर्घटनेवरुन हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल


8. उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोदी-शाह आणि बीएल संतोष यांच्यात खलबतं, नारायण राणेंना दिल्लीत बोलावल्याची सुत्रांची माहिती 


9. लसीकरणामुळं लवकरच ब्रिटनच्या रहिवाशांना मिळणार मास्कपासून मुक्ती, 64 टक्के लसीकरणानंतर 19 जुलैपासून मास्कची सक्ती शिथील करण्याचा निर्णय 


10. नागपुरात गुन्हेगारांचं थैमान, 17 वर्षीय मुलीचं अपहरण करुन दुचाकीवर बसवून मुलीला बेदम मारहाण, आरोपींकडून घटनेचा व्हिडीओ व्हायरल