मुंबई : 'एबीपी माझा'च्या दुसऱ्या नोटाबंदी सर्व्हेलाही नेटीझन्सनी भरघोस प्रतिसाद दिला. 'माझा'च्या वेबसाईटवरील या पोलवर, हजारो वाचकांनी मत नोंदवलं.

नोटाबंदीला महिना पूर्ण झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने या पोलच्या माध्यमातून केला.

यासाठीच दहा प्रश्नांच्या माध्यमातून 'माझा'ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा -

1) नोटाबंदीच्या महिनाभरानंतर सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत का?

  • होय  62.06%  (4,383 votes)

  • नाही  37.94%  (2,680 votes)


2) नोटाबंदीनंतर तुम्ही कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केली आहे का?

  • होय  77.25%  (5,101 votes)

  • नाही  22.75%  (1,502 votes)


3) कॅशलेस व्यवहारासाठी तुम्ही कोणत्या मोबाईल वॉलेटचा वापर केला?

  • पेटीएम  52.17%  (2,190 votes)

  • यूपीआय  5.19%  (218 votes)

  • अन्य  42.64%  (1,790 votes)


 4) नोटाबंदीमुळे महिनाभरात तुम्ही किती वेळा एटीएम/बँकेच्या रांगेत उभे राहिला?

  • दररोज  8.09%  (477 votes)

  • एक ते पाच वेळा  75.83%

  • पाच ते दहा वेळा  16.08%  (949 votes)


 5) तुमच्या परिसरातील एटीएममध्ये पैसे मिळाले का?

  • होय  53.59%  (3,269 votes)

  • नाही  46.41%  (2,831 votes)


 6) आठवड्यातून 24 हजार रुपये काढण्याची मुभा असताना, तुमच्या बँकेने त्याची अंमलबजावणी केली का?

  • होय  55.08%  (3,171 votes)

  • नाही  44.92%  (2,586 votes)


 7) दोन हजाराचे सुट्टे मिळवण्यात किती अडचणी आल्या?

  • सहज मिळाले  49.74%  (2,993 votes)

  • खूप त्रास झाला  50.26%  (3,024 votes)


8) नोटाबंदीमुळे काटकसरीची सवय लागली आहे का?

  • होय  87.59%  (5,236 votes)

  • नाही  12.41%  (742 votes)


9) नोटाबंदीनंतर कोणत्या बँकेने चांगली सुविधा दिली?

  • सरकारी बँका (जसे - स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक इत्यादी)  41.31%  (2,387 votes)

  • खासगी बँका (जसे - HDFC, ICICI,Axis, YES, Kotak,IndusInd)  37.37%  (2,159 votes)

  • कोणत्याही नाही  21.32%  (1,232 votes)


10) जिल्हा बँकावरील बंदीचा फटका नेमका कुणाला?

  • शेतकरी  31.8%  (3,928 votes)

  • सर्वसामान्य/नोकरदार  7.64%  (944 votes)

  • राजकारणी/संचालक  46.1%  (5,695 votes)

  • सर्वांना  14.46%  (1,787 votes)


मुख्य सर्व्हे- नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे

पहिला सर्व्हे