मुंबई : IPS मनोज कुमार शर्मा (Manoj Sharma) यांच्या आयुष्यावर ट्वेवल्थ फेल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यांची पत्नी श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांनी देखील त्यांना त्यांच्या या प्रवासात मोलाची साथ दिली. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा चित्रपट मोलाचा ठरला.बारावीत नापास झाले तरीही मनोज शर्मा यांनी जिद्द सोडली नाही. आजचं माहित नसलं तरीही भविष्य उज्वलंच करण्याचा अट्टाहास कोणालाही लाजवेल असा आहे. मनोज शर्मा यांनी 'माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला.
सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगामध्ये माझा कट्टावरची शर्मा दाम्पत्याची मुलाखत ही फार खास ठरली. कुठलाही माणूस हा जन्मत: हुशार नसतो, अनुभवानुसार ती हुशारी माणसाकडे येते, असं तत्त्व घेऊन मनोज शर्मा यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली.
12 वी नापास कसे झाले?
मनोज शर्मा यांचा जन्म छत्तीगडमध्ये झाला. त्यावेळी गावामध्ये 12 वी झाली कुठेही नोकरी मिळू शकते अशी मानसिकता होती. पण तुम्हाला जर चांगले मार्क हवे असतील तर जिथे जास्त प्रमाणात कॉपी होते, त्या शाळेत प्रवेश घेणं आवश्यक असतं. माझ्या 12 वी वेळी जे आम्हाला सुपरवायजर आले होते ते अत्यंत प्रमाणिक होते. त्यांनी आम्हाला कॉपी करु दिली नाही आणि फेल झालो, असं मनोज शर्मा यांनी सांगितलं. त्यावेळी त्या सुपरवायज यांच्याशी संपर्क केला. कारण मला तेव्हा लक्षात आलं की जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर प्रामाणिक व्हावं लागेल. आपल्या समाजात खूप चांगली माणसं आहे. माझ्या नशिबात ही चांगली माणसं आली, त्यातलीच एक श्रद्धा देखील आहे.
मनोज यांचं व्यक्तीमत्त्व अत्यंत सकारात्मक - श्रद्धा शर्मा
मनोज आमची भेट एका कोचिंग क्लासमध्ये झाली. त्यावेळी परीक्षेमध्ये मनोज यांना चांगले गुण मिळालचे. पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी यश देखील संपादन केलं होतं. मला क्लासमध्ये सांगण्यात आलं की विषय निवडायचे असतील तर तुम्ही मनोज यांचं मार्गदर्शन घ्या. उद्याची खाण्यची स्थिती काय आहे हे जरी माहित नसलं तरी परवा माझं भविष्य कसं आहे, हे मनोज यांना माहिती असतं, त्यांच्या याच स्वभावाच्या प्रेमात मी पडले, असं श्रद्धा शर्मा यांनी सांगितलं.
कसे होते सुरुवातीचे दिवस?
सुरुवातील मला काहीतरी काम करणं फार आवश्यक होतं, कारण घरखर्च चालवायचा होता. मी लोकांच्या दारावरची बेल वाजायचो आणि ट्युशनसाठी विचारायचो. पण जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत मला कोणीही ट्युशनसाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर मी दुसरं काही काम मिळेल का याची शोधाशोध करु लागलो. तेव्हा मला कुत्र्यांना फिरवायचं काम मिळालं आणि माझ्या खर्चाचा प्रश्न मार्गी लागला, या आठवणींचा उलगडा मनोज शर्मा यांनी माझा कट्टावर केला. कोणतीही परीक्षा तुमची हुशारी ठरवू शकत नाही. हुशारी ही पुस्तकांची नाही तर आयुष्याची असते, हे IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्याचं तत्व आहे.
हेही वाचा :