सातारा : पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्यावा अशा आशयाचं पत्र अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलं आहे. सध्या छत्तीसगडमध्ये निवडणुकांचे वारे वाहतायत. त्यातच भाजपने येत्या काळामध्ये छत्तीसगडमध्ये पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. 


अभिजीत बिचुकले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहतात. त्यातच आता त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्यावा असं पत्र लिहिलं आहे. या पत्रावर मुख्यमंत्री शिंदे काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. 


अभिजीत बिचुकले यांनी काय म्हटलं?


राज्याचे मुख्यमंत्री हे सातारचे आहेत. जर छत्तीगडमध्ये जर भाजप सत्तेत आलं तर ते पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देतील. तुम्ही 14 सालापासून सत्तेवर आहात. त्यामुळे आता तुम्हीही राज्यात पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या.  एकनाथराव हे सध्या शिवसेना फोडून तोडून मोडून तिकडे गेलेत. त्यांचं मी मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन देखील केलं. तुम्ही सातारकर आहात शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी तुम्हाला सूचना करू इच्छितो की तुम्हीही पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या.  तुम्ही सारखं ते बाळासाहेब ठाकरेंची सेना  म्हणताना त्यात आमच्या स्वर्गीय ठाकरे यांची पुण्यतिथी 17 तारखेला आहे. त्यांच्यावरील प्रेमाखात  सिलेंडरची  500 रुपये योजना तुम्ही करा आणि बाळासाहेब ठाकरे वरचे प्रेमही दाखवा, असं अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं. 


दरम्यान अभिजीत बिचुकले यांच्याकडून सातत्याने चर्चेत राहणारी विधानं करण्यात येतात. त्यातच आता त्यांनी सरकारला पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याचं पत्र लिहिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले हे चर्चेत येणार असल्याचं म्हटलं जातंय. 


छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून अनेक आश्वासनं दिली जात आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याचं आवाहन त्यांना करण्यात भाजपकडून करण्यात आलंय. तीच योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात राबवावी अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी यावेळी केलीये. 


हेही वाचा : 


Kolhapur News : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच व्यासपीठावर येणार; त्याच दिवशी मनोज जरांगे-पाटलांचा जंगी करवीर नगरीचा दौरा!