आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 96 हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरले आहेत, अशी माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय
राज्यात काल कोरोनाच्या 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल. यापैकी सहा जण मुंबईचे तर पुण्याचे पाच तर नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 283 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 840 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
Coronavirus World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 27 लाख 18 हजारांवर
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7491 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 27.26 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.