मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 91 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाख 91 हजार 630 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 27 लाख 18 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात सात लाख 46 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर अजून जवळपास 17 सोळा लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील तीन टक्के म्हणजे 58 हजार 690 बाधित गंभीर आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.
अमेरिकेने गेल्या 24 तासात 2325 लोक कोरोनामुळं गमावले आहेत. अमेरिकेत एकूण बळींची संख्या ही 49 हजार 845 वर जाऊन पोहोचली आहे. तर रुग्णांची संख्या आठ लाख 4880 हजारांवर गेली आहे.
न्यूयॉर्क प्रांतात काल ५०७ बळी, तिथे रुग्णांची संख्या २ लाख ६८ हजार ६०८ तर एकूण मृतांचा आकडा २०,८६१ इतका झाला आहे.
त्या खालोखाल न्यूजर्सीत ५,४२८, मिशिगन मध्ये २,९७७, मासाचुसेट्स २३६०, लुझियाना १५९९, इलिनॉईस १६८८, कॅलिफोर्निया १५२३, पेनसिल्वानिया १६४५, कनेक्टिकट १६३९ आणि वॉशिंग्टनमध्ये ७११ लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.
स्पेनने गेल्या चोवीस तासात ४४० लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा २२ हजार १५७ वर पोहोचला आहे.
काल इटलीत कोविड-१९ रोगाने ४६४ माणसांचा बळी घेतला.
आता इटलीतील एकूण बळींची संख्या २५ हजार ५४९ वर पोहोचली आहे.
काल रुग्णांची संख्या २ हजार ६४६ ने वाढली, इटलीत आता जवळपास १ लाख ९० हजार रुग्ण आहेत,
इंग्लंडने दिवसभरात ६३८ लोकांनी जीव गमावला, तिथला बळीचा आकडा पोहोचला १८,७३८ वर पोहोचला आहे.
फ्रान्सने काल दिवसभरात ५१६ लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत २१ हजार ८५६ बळी, एकूण रुग्ण १ लाख ५९ हजारावर गेले आहेत.
जर्मनीत काल २६० बळी गेले, एकूण बळींची संख्या ५,५७५ इतकी झाली आहे,
इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ९० ची भर, एकूण ५,४८१ मृत्यू, रुग्णांची संख्या ८७ हजारावर पोहोचली आहे.
कोरोनाने बेल्जियममध्ये काल २२८ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ६,४९० इतका झालाय. हॉलंडमध्ये काल १२३ बळी घेतले तिथे एकूण ४,१७७ लोक दगावले आहेत.
तर टर्की २४९१, ब्राझील ३३१३, स्वित्झर्लंडने १,५४९, स्वीडनमध्ये २०२१, पोर्तुगाल ८२०, कॅनडात २१४७, इंडोनेशिया ६४७, इस्रायल १९२ तर सौदी अरेबियात १२१ बळी कोरोनामुळे गेले आहेत.
दक्षिण कोरियात काल २ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २४०झाला आहे.
आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ११ हजार ०५७ वर पोहोचली आहे, तिथे कोरोनाने २३५ लोकांचा बळी घेतला आहे.
गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८५,०२१ तर बळींच्या आकड्यात ६,६०१ ची भर पडली.
संबंधित बातम्या :
दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू
Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!
Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज
Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू