1. महाराष्ट्रात 778 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6427, मुंबईत सर्वाधिक 4200 रुग्ण, देशात 21 हजार 700 कोरोना


2. कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती


3. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 27 लाख 18 हजारांवर, मृतांची संख्या 1 लाख 91 हजार, अमेरिकेत सर्वाधिक 49 हजार 800 बळी


4. रत्नागिरीतील सहा महिन्याच्या बाळाचा दुसरा कोरोना अहवालही निगेटिव्ह, प्रकृतीत सुधारणा, पुढील 5 ते 6 दिवसात पुन्हा तपासणी करणार


5. केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांना मोठा धक्का; कोरोना व्हायरसच्या संकटामुळे महागाई भत्त्याच्या वाढीला सरकारकडून स्थगिती


6. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झालेल्या तरुणाची हायकोर्टात धाव; सीबीआयमार्फत चौकशी करण्याची तक्रारदाराची मागणी


7. येस बँक घोटाळ्यातील आरोपी धीरज आणि कपिल वाधवान यांच्या कुटुंबासह 23 जण पुन्हा क्वॉरन्टाईन, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाबळेश्वरमधील बंगल्यातच राहणार


8. सांगलीत तळीरामांचा धुमाकूळ, एकाच दिवशी कवठेमहांकाळ आणि मिरजमधील तीन दुकाने फोडून लाखोंची देशी-विदेशी दारु लंपास, गुन्हा दाखल


9. दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमच्या शिफारशीवर राष्ट्रपतींकडू शिक्कामोर्तब


10. अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबईतील आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, बहिणीच्या वादग्रस्त ट्वीटच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप