Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एक नवी घोषणा आज केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री स्वतः एक दिवस शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेती करणार, शिकणार, अशी नवीन योजना आणणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. नागपूर विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी शरद पवारांची भेट घेणार आहे. शेती बाबत चर्चा करण्यासाठी सत्तारांनी पवारांची वेळ मागितली आहे. तसेच पूरग्रस्त शेतीचा तीन दिवसाचा दौरा केल्यानंतर राज्यपालांनाही अहवाल घेऊन सोमवारी भेटणार असून मदती संदर्भातली घोषणा अधिवेशनात करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
कृषिमंत्री एक दिवस बांधावर
अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर, कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांचा दिनचर्या समजून घेतली. शेतकरी किती घाम गाळतो किती रक्त जाळतो. तो निंदन करेल तर आम्ही पण ते निंदन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल की कृषिमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील. त्यापासून आम्हाला शेतकऱ्यापासून शिकायला मिळेल, त्यांच्या अडचणी काय समजतील. जेव्हा अडचणी माहित पडेल तेव्हा त्यावर उपाययोजना काय करायचं हे माहित पडेल, याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे अशी योजना लवकरच आणणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
मंदिर, मशिदीच्या भोंग्यावरून पंचनामा करण्यासाठी आल्याची माहिती देणार
सत्तार यांनी म्हटलं की, जुलै महिन्यात नुकसानीचे पंचनामे झालेत. पण ॲागस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले नाहीत, लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. ज्याला नुकसानभरपाई मिळणार नाही त्या सर्वांची काळजी घेणार. गावात जाऊन ग्रामपंचायत असो की मंदिर, मशिद या भोंग्यावरून पंचनामा करण्यासाठी आल्याची माहिती दिली जाईल, असं सत्तार यांनी सांगितलं.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, कृषी विद्यापीठाची मदत घेऊन वारंवार होत असलेले कीट रोग, तसेच कीट हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यावर संशोधन करून टाळण्यासाठी काम केले जाईल.
संबंधित बातम्या
Aurangabad: कृषी मंत्री होताच सत्तारांनी बोलावली विभागीय बैठक, नुकसानीचा आढावा घेणार