Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती हल्ला चालवला आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पाॅडकास्टना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्यासाठी सांगत असल्याचे म्हटले आहे. मात्र, मीच त्यांच्यासाठी एक आव्हान देतोय, त्यांनी माझ्यासोबत पाॅडकास्ट करावा आणि महाराष्ट्रातील सर्व मुद्द्यांवर आणि गुजरातला पाठवलेल्या सर्व उद्योगांवर बोलूया अशा शब्दांमध्ये त्यांनी चॅलेंज दिलं आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पाॅडकास्टना होस्ट करण्यास सांगत आहे. मात्र, मी मिंधेंना चॅलेंज देत आहे. त्यांनीच माझ्यासोबत पाॅडकास्ट करावा आणि वन टू वन चर्चा करू. महाराष्ट्रातून जे उद्योग गुजरातला नेण्यात आले त्या संदर्भामध्ये चर्चा करूया. महाराष्ट्रामधील युवकांना रोजगाराची संधी असताना त्यांच्या पाठीमध्ये वार का करण्यात आला याबद्दल चर्चा करूया. शेतकरी आत्महत्या का करत आहेत. शहरी गुन्हेगारीत का वाढ होत आहे. आपल्या राज्यात महिलांना कठीण प्रसंगाला तोंड का द्यावं लागत आहे? आणि निर्लज्जपणे ते आपल्या पदाचा वापर कंत्राटदार मित्रांसाठी करत आहेत जेव्हा महाराष्ट्र भरडला जात आहे तसेच लुटला जात आहे. साधे प्रश्न आहेत असे म्हणत या ट्विटमध्ये त्यांनी सीएमओ महाराष्ट्राला टॅग केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या