पुणे : बारामती लोकसभा मतदार (Baramati Loksabha election ) संघातून माहयुतीकडून (Mahayuti) सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विकास कामाचं कौतुक केलं. बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. घडाळ्याला दिलेलं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात केला आहे. 


सुनेत्रा पवार म्हणाल्या की,  गेल्या 10 वर्षांपासून जीव झोकून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत.


अजित पवारांमुळेच बारामतीचा विकास


गेल्या 10 वर्षात बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्रांच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या 25 वर्षात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचं मॉडेल म्हणून समोर आलं आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे तर बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे. 


भारताचा विकास म्हणजे मोदींची किमया


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा चांगला विकास केला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. मोदी देशासाठी जीव झोकून काम करत आहेत. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान सारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असंही त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, विजय शिवतारे उपस्थित आहेत. 


 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...


Pune Loksabha election : सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर अन् अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; कोणते नेते उपस्थित राहणार?