पुणे : आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवा  (Ajit Pawar)म्हणाले होते. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला. अजित पवारांच्याा याच वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे. आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभेत मला तीन वेळा दिल्लीत पाठवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. आता चौथ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी मी अर्ज दाखल करत आहेत. जबाबदारी वाढलेली आहे. माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. मी आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणं ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढं ही बोलत राहिन, असं त्या म्हणाल्या.


साधारण सध्या सगळेच शरद पवारांवर टीका करताना दिसतात. शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते. हे सगळ्यांना माहित आहे.  सातत्याने चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. भाजपच्या पोटात होतं ते ओठात आले, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. 


पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे, असं विचारल्यास माझी कोणासोबतच नाती बिघडत नाहीत, राजकारणामुळं माझ्या नात्यासंबंधात अंतर येत नाही, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. आधीच्या खासदाराने काम केलं नाही, केंद्रातून एकही प्रोजेक्ट बारामतीत आणला नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर बोलताना दादांनी माझा कार्यअहवाल वाचला नसावा. मी त्यांना अहवाल पाठवेन. मेरिट वर ते मलाच मतदान करतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 



सुप्रिया सुळे आज अर्ज दाखल करणार


बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुप्रिया सुळे आपला अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित असणार आहे. शरद पवार, संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...


Pune Loksabha election : सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर अन् अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; कोणते नेते उपस्थित राहणार?