पुणे : आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांना ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. 'एका शब्दाचा उगाच बाऊ करु नये, मी ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते पुण्यातील सिंहगड रोडवरील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


काल इंदापूरात डॉक्टरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  मी गमतीने ते वक्तव्य केलं. त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा  हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या कार्यक्रमात सगळे प्रतिष्ठित डॉक्टर्स होते, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. 


अजित पवार आज सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या फक्त सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बाकी उमेदवारांचे अर्ज नंतर दाखल करण्यात येणार आहे,असंही अजित पवारांनी सांगितलं. 


...तर फोन रेकॉर्ड करा!


अजित पवारांवर दमदाटी करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. रोहित पवारांकडून असे अनेकदा आरोप करण्यात आले आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या कोणाला असे धमकीचे फोन येत आहेत. त्यांनी ते फोन रेकॉर्ड करावे आणि सगळ्यांना ऐकवावे, असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे.


अजित पवारांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन


सुनेत्रा पवारांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी दगडूशेठ गणपती मंदिरात आरती करुन विजयासाठी साकडं घातलं.  अजित पवार म्हणाले की, चांगल्या वातावरणात पार पडाव्यात त्याकरता गणरायाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा मोदी बसत असताना महाराष्ट्राचा त्यामध्ये मोठा वाटा पाहिजे. महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदावर लोकसभेला जास्तीत जास्त निवडून यावेत, अशी प्रार्थना देवाला केली आहे. आशिर्वाद घेतला असला तरी प्रत्येकाला काम करावे लागते, फिरावे लागते. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. 


 पाहा व्हिडीओ-



इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...