सांगली : स्मशानभूमीच्या वादातून 26 तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधीविना हेळसांड सुरू होती. 26 तासानंतर मात्र तोडगा न निघाल्याने मयत महिलेच्या घराशेजारीच शेवटी त्या महिलेचे दफन करण्यात आले. सांगलीच्या कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी यांनी वांगी गावातील आणि या मयत महिलेच्या समाजातील लोकांची 30 जानेवारी रोजी एक बैठक बोलावली असून यात या यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले. स्मशानभूमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे वांगी गावात तणावाचे वातावरण निर्माण होते.


सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी याठिकाणी लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून एका महिलेचा अंत्यविधी 26 तास रखडला होता. रविवारी ( 26 जानेवारी) वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी औंधे यांचे निधन झाले. यानंतर गावातील असणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीत दफन करण्याची तयारी करण्यात आली. मात्र गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. आणि त्यानंतर या ठिकाणी दोन्ही समाजाच्या मध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊन 26 तासांपासून वांगी येते अंत्यविधीविना रखडून पडला होता.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वतः वांगी गावात जाऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक पातळीवर या जागेचा वाद निर्माण झाल्याने या ठिकाणी अंत्यसंस्कार हे पार पडू शकले नाहीत. सदरची जागा ही दुसऱ्या समाजाने आपल्या मालकीच्या असल्याचा दावा केला आहे. तर लिंगायत समाजाने या जागेवर अनेक वर्षांपासून दफनविधी केला जात असल्याचा दावा करत त्याच ठिकाणी दफनविधी व्हावा अशी मागणी लावून धरली होती. मात्र या वादातून याठिकाणी 26 तासापेक्षा अधिक काळ दफनविधी पार पडला नाही. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रशासनाने या दफनभूमीपासून जवळच असलेल्या पर्यायी जागेत दफनविधी करण्याचा तोडगा काढला. मात्र लिंगायत समाज बांधवांनी यावर नाराजी व्यक्त करून अखेर या महिलेच्या घराशेजारी दफनविधी करण्यात आला . वांगी गावातील स्मशानभूमीचा हा विषय सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी 30 जानेवारी रोजी एक बैठक बोलावली असून या बैठकीत या गावातील या समाजातील व्यक्तींच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे.

नेमका वाद काय

वांगी येथील गट नंबर 1599 आणि 2469 मध्ये असलेल्या परंपरागत दफनभूमीत लिंगायत समाजातील मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे दफनविधी केले जातात. तसेच सात बारा खाते उतऱ्यावरती पीकपाणी मध्ये 12 गुंठे स्मशान पड अशी नोंद आहे. परंतु शब्दाची गल्लत करून त्या हक्काच्या दफनभूमीच्या जागेतून लिंगायत समाजाला हद्दपार करण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे असा आरोप करत हा समाज आक्रमक झाला होता.

Washim | वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात जीवाशी खेळ, वाशिममध्ये सफाई कर्मचारीच बनली डॉक्टर