मुंबई : नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात 'मित्र' संस्थेची स्थापना होणार आहे. शासनाने नुकतीच याला मंजुरी दिली आहे. नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत, मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास करणे हा 'मित्र'च्या स्थापनेमागील उद्देश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन असे या संस्थेचे नाव असणार आहे. मित्र ही संस्था शेती, आधुनिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे काम करेल.
केंद्र सरकारने भारताच्या अमृत मोहोत्सवानिमित्त म्हणजे 2047 पर्यंत भारताला विकसीत देश करण्याचा संकल्प केलाय. यासाठी भारतीय अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलयन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्ट जाहीर केले आहे. तेसेच 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे उदिष्ट देखील साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. विकसीत भारताची उदिष्टे साध्य करताना भारतातील सर्व राज्यांना देखील विकसीत करणे सरकारचे उदिष्ट आहे. आहे. या दृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स तर 2047 पर्यंत 3.5 ट्रिलिय डॉलर करण्याचे राज्याचे उदिष्ट आहे. त्यासाठीच नीती आगोगाच्या धर्तीवर राज्यात देखील मित्र या संस्थेची स्थापणा करण्यात येणार आहे.
राज्याचा विकास जलग गतीने होण्यासाठी मित्र ही संस्था सरकारी मालमत्तांचे निर्गुंतवणुकीकरण, कृषी क्षेत्रात ब्लॉकचेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरत, दळणवळण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करेल.
'मित्र;ची कार्ये काय असणार?
राज्याच्या विकासाला धोरणात्मक,तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून काम करेल.
राज्याचे निर्धारित उदिष्ट साध्य करण्याच्या हेतूने शासनाच्या विविध विभागांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे.
विविध विभाग, भारत सरकार, नीती आयोग, सिव्हिल सोसायटी, विविध अशासकीय संस्था तसेच खासगी व्यवसायिक संस्था यांच्यात संवाद घडवून आणून विकासाच्या नवीन उपाययोजना सुचविणे.
मित्रद्वारे कृषि, संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कौशल्य विकास आणि नाविन्यता, नागरिकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन आणि क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, उद्योग आणि लघू उद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण या दहा क्षेत्रात लक्ष केंद्रीत करणे, तसेच पर्यावरण, वने आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवर देखील विशेष लक्ष देणे.
या सर्व क्षेत्रांच्या प्रभावी अंमलबजावणी आणि संनित्रणासाठी पूरक असणारे नावीन्यपूर्ण क्षेत्र, ड्रोन टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि मशिन लर्निंग, सायबर सुरक्षा यांचा वापर करणे.
कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांमध्ये आणि शहरांमध्ये विकासाच्या योजना राबणे आणि त्याचा विळोवेळी आढावा घेणे.
राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि सीएसआर ट्रस्ट फंड यांच्याकडू विकासात्मक उपक्रमांसाठी राज्य शासनाच्या मालमत्तेचे मुद्रीकरण आणि सवलतीचा वित्तपुरवठा यांसारख्या नाविन्यपूर्ण साधनांद्वारे अर्थसंकल्पबाह्य संसाधने उभारण्याचा सल्ला देणे.
राज्य शासनाच्या विविध विभागांना मदत करत असताना स्थानिक पातळीवरील नियोजन आणि विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांचा डेटा अॅनालिटिक्स माध्यमातून सहाय्य करणे. अंमलबाजवणी करणाऱ्या यंत्रणांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी परिणाम अधारित रिअल टाईम मुल्यांकनाच्या माध्यमातून मदत देण्याचा 'मित्र'चे कार्य असेल.