मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. केतकी चितळेच्या वतीने वर्तक नगर पोलिस ठाण्याला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून अजून कलमे त्यात वाढवण्यात यावीत अशी मागणी, केतकी चितळे हिने आपल्या नोटीसीमधून केली आहे. 


ठाण्यातील मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी ठाण्यातील वर्तक पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात आता केतकी चितळे हिने उडी घेतली आहे. 


हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने कलम 354 लावावे आणि प्लॅनिंग करून सर्व केल्याने कलम 120 ब लावावे, अशी मागणी केतकीने केली आहे. वर्तक नगर पोलिसांनी कलमे वाढवली नाहीत तर केतकी हायकोर्टात जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.    


काय म्हटलंय केतकीने? 


जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील अशी आहेत. परंतु, या कलमांध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं. शिवाय हा हल्ला कट रचून करण्यात आाय. परंतु, पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचं कलम लावलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कलमांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केतकीने केली आहे. 


काय आहे प्रकरण? 
'हर, हर महादेव' चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले असून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी झाली आहे, असा आरोप करण्यात योतोय. त्यामुळेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढलं होतं. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यामुळे या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्त्यांवर ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना दुपारी ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.    


महत्वाच्या बातम्या


Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक, 'हर हर महादेव' चित्रपटाचा राडा भोवला