Satara :  मित्र-मैत्रिणीसोबत रंगपंचमी खेळताना टेंभू धरणात महाविद्यालयीन युवती बुडाल्याची घटना घडली आहे. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर या मुलीचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू धरणात घडली आहे. सकाळी 12 वाजता युवती बुडाली होती. सांगली जिल्ह्यातील खंबाळे बोगद्यात मुलीचा मृतदेह आढळला आहे. 

कॉलेजच्या सहा जणांचा ग्रुप रंगपंचमी खेळत होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. जुही घोरपडे असे या बुडालेल्या युवतीचं नाव आहे. जुहीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलगी नेमकी धरणात कशी बुडाली? ही घटना कशी घडली याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाळे गावात सापडला आहे. आजच्या रंगपंचमीच्या सणादिवशीच ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

आनंदाच्या आणि उत्साहाच्या दिवशीच सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना

होळी झाली की सर्वांना वेध लागतात ते रंगपंचमी सणाचे. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो तो रंगपंचमीचा सण. फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व गोप आणि गोपिकांना एकत्र करून रंगाचा हा सण साजरा करत असे. यंदा रंगपंचमीचा सण हा उदय तिथीनुसार 19 मार्चला म्हणजे आज साजरा होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सण आवडतो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे. मनातील हेवे-दावे बाजूला ठेवून मन मोकळेपणाने रंगपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या होळीच्या अवघ्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये रंगपंचमीचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाशी संबंधित प्रचलित समजुतीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवतांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात.  पण या आनंदाच्या आणि उत्साहाच्या सणादिवशीच सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रंगपंचमी साजरी करताना धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Rang Panchami 2025 Wishes: रंग हर्षाचा.. रंग सुखाचा...आजची रंगपंचमी खास! प्रियजनांना पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश..