On This Day In History : तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) (Zakir Hussain) यांचा यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. तबला वाजवाचे कौशल्य त्यांना त्यांचे वडील अल्ला रक्खा खान यांच्याकडून मिळाले आहे, जे स्वत: प्रसिद्ध तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून पखावज वाजवायला शिकले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला आणि 1973 मध्ये त्यांनी 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' नावाचा पहिला अल्बम लॉन्च केला. त्यांच्या या अल्बमला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हुसेन हे भारतात तसेच जगात खूप प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार जागतिक मैफलीत भाग घेण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार होते. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना संगीताच्या जगातील सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्कार दोनदा मिळाला आहे. 1992 मध्ये 'द प्लॅनेट ड्रम' आणि 2009 मध्ये 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी.
1956: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा जन्मदिन (Shashi Tharoor Birthday)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा आज वाढदिवस आहे. शशी थरूर हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथून लोकसभेचे खासदार आहेत. शशी थरूर हे केवळ केरळमधीलच नव्हे तर देशातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत. शशी थरूर यांची गणना सुशिक्षित आणि उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या खासदारांमध्ये केली जाते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवले आहे. शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 रोजी लंडन, इंग्लंडमध्ये एका मल्याळी कुटुंबात झाला. शशी थरूर यांच्या वडिलांचे नाव चंद्रन थरूर आहे. शशी थरूर यांच्या आईचे नाव लिली थरूर आहे. शशी थरूर यांच्या वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीत लंडन, दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासह अनेक ठिकाणी काम केले आहे. शशी थरूर यांनी जवळपास 29 वर्षे संयुक्त राष्ट्रात काम केले आहे. शशी थरूर यांनी सर्वप्रथम 1978 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या उच्चायुक्तात कर्मचारी सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर, 1989 मध्ये, शशी थरूर यांची संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे कार्यकारी सहाय्यक बनले. 2001 मध्ये शशी थरूर यांची कम्युनिकेशन्स आणि पब्लिक इन्फॉर्मेशनचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन 2006 मध्ये भारत सरकारने शशी थरूर यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पदासाठी नामनिर्देशित केले, परंतु नंतर दक्षिण कोरियाचे बान की मून यांचा विजय निश्चित झाल्याने शशी थरूर यांनी उमेदवारी मागे घेतली. पुढे त्यांनी विचारधारा लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये शशी थरूर यांनी केरळमधील तिरुवनंतपुरममधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्यानंतर ते खासदार झाले. यानंतर ते मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्री झाले. शशी थरूर यांची केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2012 मध्ये शशी थरूर यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री करण्यात आले. यानंतर शशी थरूर यांनी 2014 साली तिरुअनंतपुरममधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशी थरूर पुन्हा एकदा विजयी झाले आणि खासदार झाले.
1985: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म
यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अगदी लहान वयातच टीम इंडियात स्थान मिळवले होते. त्याने ऑगस्ट 2002 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यानंतर तो अनेक सामन्यांमध्ये चांगला खेळला. मात्र तो संघात स्वत:ला पूर्णपणे प्रस्थापित करू शकला नाही. पार्थिवनंतर महेंद्र सिंह धोनीचा संघात प्रवेश झाला आणि धोनीने प्रत्येक फॉरमॅटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. पण पार्थिव त्याच्या कारकिर्दीत चढ-उतारांना तोंड देत राहिला. टीम इंडियाच्या या यष्टीरक्षक फलंदाजाचा आज (9 मार्च) वाढदिवस आहे. पार्थिवने त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. यानंतर तो अनेक सामन्यांमध्ये चांगला खेळला.
1967: सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिनची मुलगी स्वेतलानाने देश सोडला आणि राजकीय आश्रय घेण्यासाठी नवी दिल्लीतील यूएस दूतावास गाठला.
1970: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.