उस्मानाबाद : तब्बल 73 कोटी खर्चून एसटी महामंडळाने तयार केलेल्या नव्या ड्रेस वाटपाचा पुरता उस्मानाबादमध्ये पुरता फज्जा उडाला आहे. विभागीय मंडळनिहाय आज कर्मचाऱ्यांना नव्या ड्रेसचं वाटप होणार होतं. मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या ड्रेस वाटप कार्यक्रमात अवघ्या पाच मिनिटांत परत घेतले.


2200 कर्मचारी असलेल्या उस्मानाबाद विभागात फक्त 90 ड्रेस आले होते. या कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यापूर्वीच आपली मापं दिली होती. ती मापं न जुळल्यानं आलेले ड्रेसही परत घ्यावे लागले आहेत. 32 प्रकारच्या ड्रेसपैकी केवळ तीनच प्रकारचे ड्रेस उस्मानाबाद विभागात दाखल झाले आहेत. दरम्यान या कपड्यांच्या दर्जाबाबत कर्मचारी नाराज आहेत.

महिला कर्मचाऱ्यांच्या साडीची किंमत 630 रुपये आणि सलवार कुर्त्याची किंमत 998 आहे. वाहक आणि चालकांसाठीही अश्याच किंमतीचे ड्रेस देण्यात आले आहेत. या कपड्यांच्या दर्जाबाबत कर्मचारी आरोप करत आहेत.