9 January Headlines : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वच न्यायालयांमध्ये आजपासून ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल. आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. याबरोबरच आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करणार
12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झालीय. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करतायत. आज या प्रकरणात चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
आयसीआसीआय बॅंक घोटळा प्रकणी हायकोर्टाचा निकाल
आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांच्या याचिकेवर हायकोर्ट सकाळी 10:30 वाजता निकाल जाहीर करणार आहे. सीबीआयची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची कोचर दांपत्यानं हायकोर्टाकडे मागणी केली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरबाबत राज्य सरकार हायकोर्टात नव्यानं भूमिका स्पष्ट करणार
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरबाबत आज राज्य सरकार हायकोर्टात नव्यानं आपली भूमिका स्पष्ट करणार. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार पुन्हा नव्यानं बेबी पावडरच्या नमुन्यांची चाचणी शक्य आहे का? याबाबत एफडीए देणार माहिती. त्यानंतर हायकोर्ट आपले निर्देश जारी करणार आहे.
आजपासून न्यायालयांमध्ये ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात
सर्वच न्यायालयांमध्ये आजपासून ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल. वकील मंडळींना, पक्षकारांना घरबसल्या प्रकरणे न्यायालयात दाखल करता येतील आज या प्रणालीचा बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा
आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. आज किन्नरांसाठी महत्वाचा दिवस आहे. अमरावती शहरातून देशभरातून आलेले किन्नर सजून डजून या कलश यात्रेत सहभागी होतात. यावेळी अनेक किन्नर एक ते दिड किलो सोन्याचे दागिने परिधान करून या कलश यात्रेत सहभाग घेतात.
यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा धडक आक्रोश मोर्चा
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत.
मुंबईत खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन
खासदार सुनील तटकरे यांच्या लोकसभेतील भाषणांच्या पुस्तकाचं आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन पार पडणार आहे.