Kolhapur Crime : सांगलीच्या सराफाला कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचे भासवून 80 लाखांची लूट केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित सराफाने मित्राच्या दुकानातून 80 लाखांची रक्कम घेताना कामगारांनी पाहिले होते. त्यानंतर हा लुटीचा कट रचण्यात आला होता. आयकर अधिकारी असल्याचे भासवून ही लूट करण्यात आली होती. 


ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मुक्तसैनिक वसाहत चौकात 19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यामुळे या लूटमारीचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्याद़ृष्टीने पोलिसांनी नजीकच्या सांगली, सातारा जिल्ह्यांसोबतच इतरत्रही पथके तैनात करून तपास केला होता.


गांधीनगर येथील व्यापारी संतोष कुकरेजा यांची फुटवेअर विक्रीची फर्म आहे. फर्ममध्ये धनाजी आनंदा मगर (वय 32, रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) कामाला आहे. आर्थिक उलाढालीची जबाबदारी त्याच्यावर आहे. 19 ऑक्टोबरला रात्री सव्वादहाच्या सुमारास तो फर्ममधील 80 लाख 13 हजारांची रोकड घेऊन कोल्हापूर शहराच्या दिशेने एका मोपेडवरून येत होता. या मोपेडचा पाठलाग दोन मोटारसायकलवर बसलेले चौघेजण गांधीनगर येथूनच करत होते. 


या चौघांनी मुक्तसैनिक वसाहतजवळ मोपेड अडविली. धनाजी मगरला दम देत डिकीतील रक्कम पाहून चौकशी करायची आहे, असे सांगून मगरला ते शिरोली एमआयडीसीच्या दिशेने घेऊन गेले. त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेत मगर याला सांगली फाट्यावर सोडून फरार झाले होते. रक्कम मोठी असल्याने आणि सणासुदीच्या काळात हा प्रकार घडल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. ही रोकड पाळत ठेवूनच लुटल्याचा पोलिसांना अंदाज होता. त्याद़ृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या